मानसशास्त्राला इंग्रजीत psychology हा शब्द आहे.psyce म्हणजे वर्तन (behaviour ) आणि Logos याचा अर्थ अभ्यास (study )या दोन ग्रीक शब्दांपासून psychology हा शब्द तयार झाला. अगदी सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राला स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते. तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून त्याचा विचार केला जात असे.
इस.पूर्व ३८४-३२२ या काळात प्लेटो, अॅरीस्टाॅटल या ग्रीक विचारवंतांनी मानसशास्त्राबद्दल स्वतंत्र विचार केलेला दिसतो. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या प्लेटो याने केली. परंतु आत्म्याचे स्थान नक्की कोठे असते, त्याचे स्वरूप कसे असते असे प्रश्न निर्माण झाल्याने हि व्याख्या स्वीकारण्यास अडचणी येऊ लागल्या. त्याच दरम्यान अॅरीस्टाॅटलयांनी डी. अॅनिमा हा ग्रंथ लिहिला. व मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे असे प्रतिपादन केले. परंतु याही व्याखेमध्ये मानसशास्त्राचा अभ्यासविषय स्पष्ट होत नव्हता. मनाचे स्वरूप, अस्तित्व व कार्यपद्धती याविषयी संदिग्धता होती त्यामुळे हि व्याख्यादेखील मागे पडली. जरी या व्याखेवर आक्षेप घेण्यात आले तरी आजच्या काळातही मन या संकल्पनेचा पगडा जनमानसावर आहे.

मधल्या काळात शास्त्र व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम मानसशास्त्राच्या अभ्यासावरही झाला. त्याची परिणीती १८७९ मध्ये विल्यम वूंट यांनी जर्मनीतील लिप्झिंग येथे पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली. मानसशास्त्र जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी नवीन व्याख्या केली गेली. व्यक्तीच्या बोधावास्थेतील अनुभव, विविध मनोव्यापार(विचार, स्मृती, भावना इ.) व शारीरिक प्रक्रिया (तहान, भूक निद्रा इ. ) यांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करता येणे शक्य असल्याचे मानसशास्त्राने दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी अंतरनिरीक्षण पद्धतीचा वापर केला. परंतु मानसशास्त्र फक्त बोधावास्थेतील अनुभवांच्या अभ्यासापुरते मर्यादित नाही व आत्मनिरीक्षण पद्धती प्राणी, लहान मुले मनोविकृत व्यक्ती यांच्यासाठी उपयुक्त नाही हे लक्षात आल्याने या व्याखेच्याही मर्यादा लक्षात आल्या. याच दरम्यान डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत (psychoanalysis Theory ) मांडला. त्यात त्यांनी व्यक्तीच्या अबोध मनाचा अभ्यास केल व व्यक्तीवर्तनावर होणा-या अबोध मनातील प्रक्रियांचा होणारा परिणाम स्पष्ट केला. त्यामुळे मानसशास्त्राच्या व्याखेत अबोधमनाच्या संकल्पनेची भर पडली. व मानसशास्त्र म्हणजे बोधावस्था आणि अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या पुढे आली. हि व्याख्या काही काळ टिकून राहिली. पण २०व्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवाद (behaviorism ) मांडला गेला.
फिल्ड्मन, मॅकड्यूगल, वॉटसन यासारख्या वर्तनवादी विचारवंतांनी वर्तनाची संकल्पना मंडळी. मानसशास्त्र वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करते अशी नवीन कल्पना फिल्ड्मन यांनी मंडळी. वर्तनामध्ये दृश्य, अदृश्य किंवा बोधात्मक व अबोधात्मक वर्तनाचा समावेश होतो. पण नक्की कोणाच्या वर्तनाचा अभ्यास हे वरील व्याखेतून स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे 'मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय' हि व्याख्या प्रचलित झाली.
या व्याखेतून मानव प्राणी यांच्या सर्वंकष वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र अशी परिपूर्ण व्याख्या तयार झाली, जी अगदी अलीकडच्या काळापर्यंत प्रचलित होती.
मानसशास्त्राच्या या व्याख्यांच्या वाटचालीत अनेक बदल झाले. विविध विचारप्रणालींचा उदय, तंत्रज्ञानाची प्रगती, आधुनिकता या सर्वांचा परिणाम मानसशास्त्राच्या अभ्यासावर झाला. व त्याचा परिणाम म्हणून मानसशास्त्रामध्ये विविध दृष्टीकोन आढळून येतात. एकून या वाटचालीकडे पाहता लक्षात येते की, आता मानसशास्त्राचा विषय अभ्यासपद्धती, इत्यादीबाबत नेमकेपणा येत चालला आहे. आणि नेमके याबाबत सांगायचे तर, मानसशास्त्र हे केवळ मानव मनोव्यापारांच्या अभ्यास करणे किंवा त्यांची कारणीमिमांसा करणे इतकेच मर्यादित नाही, तर त्याचा मानवी कल्याणासाठी, समृद्ध जीवनासाठी कसा उपयोग करता येईल याचा अभ्यास करते.